कल्याणमधील ज्येष्ठ वकील दत्तात्रय सबनीस यांचे निधन

17 Aug 2025 18:45:26

डोंबिवली : कल्याणमधील दिवाणी कायद्यातील ज्येष्ठ वकील दत्तात्रय नीळकंठ सबनीस (वय ९६ वर्ष) यांचे त्यांच्या राहत्या घरी वृध्दापकाळाने शनिवार दि. १६ ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे दोन मुलगे उज्वल व रमेश, मुलगी तिलोत्तमा, सून अर्चना आणि नातवंडे, पंतवंडे असा मोठा परिवार आहे.

कल्याणमधील ज्येष्ठ दिवंगत वकील श्रीधर नीळकंठ उर्फ भाऊ सबनीस यांचे दत्तात्रय हे धाकटे बंधू आहेत. सबनीस हे आप्पा या नावाने सर्वाना परिचित होते. त्यांनी सुमारे साठ वर्ष दिवाणी कायद्यात वकीली व्यवसाय केला. ते कल्याणच्या महालक्ष्मी मंदिर आणि लक्ष्मी नारायण देवस्थानचे अनेक वर्ष विश्वस्त होते. त्यांचे आजोबा, वडील नीळकंठ , आणि पुढे दोन्ही सबनीस बंधू वकिली व्यवसायात होते. त्यांचा वारसा आता त्यांच्या सूनबाई अर्चना पुढे चालवत आहे.


Powered By Sangraha 9.0