स्टार्टअप क्रांती

    17-Aug-2025
Total Views |

भारतामध्ये स्टार्टअप संस्कृतीला सरकारच्या धोरणांनी नवी ऊर्जा दिली आहे. दि. ३० जूनपर्यंत सरकार मान्यताप्राप्त स्टार्टअप्सची संख्या तब्बल १ लाख, ८० हजार, ६८३ वर पोहोचली असल्याचे केंद्रीय मंत्री जितेंद्र प्रसाद यांनी सांगितले. हीच संख्या २०१६ साली केवळ ५००च्या आसपास होती. केवळ नऊ वर्षांच्या काळात स्टार्टअपच्या संख्येत झालेली ही प्रचंड वाढ सरकारच्या योग्य धोरणांमुळे उद्योजकतेला मिळालेल्या प्रोत्साहनाचा ठोस पुरावा आहे. देशातील स्टार्टअपच्या वाढीसाठी मोदी सरकारने अनेक महत्त्वाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. या योजनांमुळे हजारो उद्योजकांना निधी, हमी व व्यावसयिक मार्गदर्शनाचा लाभ झाला असून, त्यामुळेच नवउद्योजकांच्या कल्पनांना बळकटी मिळाली आहे. केवळ आकड्यांचा विचार केला, तरी १ हजार, २०० पेक्षा अधिक स्टार्टअप्समध्ये हजारो कोटींची गुंतवणूक झाली आहे. यामुळे नवे उद्योग निर्माण झाले नाहीत, तर देशात रोजगारनिर्मिती व आर्थिक विकासालाही गती मिळाली आहे.भारतामध्ये स्टार्टअप संस्कृतीला सरकारच्या धोरणांनी नवी ऊर्जा दिली आहे. दि. ३० जूनपर्यंत सरकार मान्यताप्राप्त स्टार्टअप्सची संख्या तब्बल १ लाख, ८० हजार, ६८३ वर पोहोचली असल्याचे केंद्रीय मंत्री जितेंद्र प्रसाद यांनी सांगितले. हीच संख्या २०१६ साली केवळ ५००च्या आसपास होती. केवळ नऊ वर्षांच्या काळात स्टार्टअपच्या संख्येत झालेली ही प्रचंड वाढ सरकारच्या योग्य धोरणांमुळे उद्योजकतेला मिळालेल्या प्रोत्साहनाचा ठोस पुरावा आहे. देशातील स्टार्टअपच्या वाढीसाठी मोदी सरकारने अनेक महत्त्वाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. या योजनांमुळे हजारो उद्योजकांना निधी, हमी व व्यावसयिक मार्गदर्शनाचा लाभ झाला असून, त्यामुळेच नवउद्योजकांच्या कल्पनांना बळकटी मिळाली आहे. केवळ आकड्यांचा विचार केला, तरी १ हजार, २०० पेक्षा अधिक स्टार्टअप्समध्ये हजारो कोटींची गुंतवणूक झाली आहे. यामुळे नवे उद्योग निर्माण झाले नाहीत, तर देशात रोजगारनिर्मिती व आर्थिक विकासालाही गती मिळाली आहे.

या स्टार्टअप वाढीसाठीच्या धोरणांचा सकारात्मक परिणाम आज विविध क्षेत्रांत दिसून येतो. अनेक क्षेत्रांत स्टार्टअप्सने नवे प्रयोग सुरू केले आहेत. ही वाढ केवळ महानगरांपुरती मर्यादित नसून, टियर-२ व टियर-३ शहरांमध्येही उद्योजकतेची नवीन बीजे पेरली जात आहेत. अनेक राज्यांमध्ये आज महिला व ग्रामीण उद्योजकांनाही संधी आणि प्रोत्साहन मिळाल्याने, देशातील उद्योजकता अधिकच समावेशक होत आहे. सरकारने २०१६ सालापासून स्टार्टअपच्या वाढीसाठी जो पाया घातला, त्याचे परिणाम आज आपण पाहतो आहोत. एका लहान सुरुवातीपासून आज लाखो उद्योजकांचा समुदाय देशात आकार घेत आहे. हे फक्त आकड्यांचे यश नाही, तर भारताच्या आत्मविश्वासाचेही प्रतीक आहे. योग्य दिशा, आवश्यक मदत आणि धोरणात्मक पाठबळ मिळाले, तर भारतीय उद्योजकता जागतिक उद्योजकता क्षेत्रात कोणताही बदल घडवू शकते, याचा प्रत्यय जगाला येत आहे. आज ‘स्टार्टअप इंडिया’ हा फक्त एक सरकारी उपक्रम राहिलेला नाही, तर भारताच्या भविष्यातील आर्थिक शक्तीचा खरा पाया ठरत आहे. ‘स्टार्टअप इंडिया’ची हीच गती कायम राहिली, तर ही योजना भारताच्या आर्थिक सामर्थ्याची प्रभावी कहाणी ठरेल.

आत्मनिर्भरतेचा नवा अध्याय

भारतातील ‘एफएमसी’जी क्षेत्रात आज एक नवा प्रवाह दिसून येतो आहे. पूर्वी मोठ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचीच या क्षेत्रात मक्तेदारी होती. परंतु, आता ग्राहकांचा कल झपाट्याने बदलत असून, प्रादेशिक ब्रॅण्ड्सला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. ‘होनासा’ या कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष वरुण आलाघ यांनी अलीकडेच स्पष्ट केले की, ग्राहकांच्या मनोवृत्तीमध्ये होणारे हे बदल लक्षणीय असेच आहेत. स्थानिक गरजांना समजून घेणारे आणि नवीन ब्रॅण्ड्स ग्राहकांच्या पसंतीस उतरू लागले आहेत. हे बदल हे फक्त व्यवसायाची समीकरणे नसून, भारतातील स्वदेशी भावनांचे द्योतक आहेत. ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेला आता भारतीय नागरिकांनी प्रत्यक्षात स्वीकारले आहे. एकेकाळी केवळ घोषवाय वाटणारी ही कल्पना आज ग्राहकांच्या खरेदीविषयक निर्णयात प्रतिबिंबित होते आहे. भारतीय नागरिकांना वाटते की, आपल्या पैशातून देशातील उत्पादकांना बळ मिळावे, देशातील रोजगार वाढावा आणि स्वदेशी ब्रॅण्ड्स अधिक सक्षम व्हावेत. त्यामुळेच प्रादेशिक ब्रॅण्ड्सला ते पसंती देतात. हे ब्रॅण्ड्स एकेकाळी स्टार्टअप्स म्हणून सुरू झाले होते आणि अल्पावधीतच त्यांनी बाजारपेठेत आपले वेगळे स्थान निर्माण केले.

यामध्ये सरकारच्या धोरणांची भूमिका महत्त्वाची आहे. गेल्या काही वर्षांत स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी जी धोरणे आखली गेली, त्यांचा परिणाम आता प्रत्यक्ष दिसतो आहे. सरकारी धोरणामुळे नवीन कंपन्यांना मोठ्या ब्रॅण्ड्सना आव्हान देणेही शय झाले आहे. ग्राहकांच्या दृष्टीने पाहता, प्रादेशिक ब्रॅण्ड्स त्यांच्या संस्कृतीशी आणि जीवनशैलीशी अधिक जवळीक साधतात. मोठ्या राष्ट्रीय कंपन्यांच्या तुलनेत ते ग्राहकांच्या गरजांशी थेट नाळ जोडतात. उदाहरणार्थ, स्थानिक चवीचे, पॅकिंगमध्ये साधेपणाचे किंवा किमतींत परवडणारे पर्याय देऊन, त्यांनी ग्राहकांना आकर्षित केले आहे. त्यामुळेच ग्राहकांना आपलेपणाची जाणीव होते आणि ते परत परत त्याच ब्रॅण्डकडे वळतात. आजचे चित्र असे आहे की, जागतिक कंपन्या भारताच्या बाजारपेठेकडे पाहतात. परंतु, त्याचवेळी भारतीय ग्राहक नव्या स्वदेशी ब्रॅण्ड्सला संधी देतात. स्वदेशीवरील प्रेम, सरकारी धोरणांचा आधार आणि स्टार्टअप्सची मेहनत या तिन्हींच्या संगमामुळे आज प्रादेशिक ब्रॅण्ड्स भारतीय उद्योगजगताची यशोगाथा लिहिण्यासाठी सज्ज आहेत.