मुंबई : सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्व व वस्तुसंग्रहलये संचालनालय, सांस्कृतिक कार्य संचालनलय, पु.ल. देशपांडे कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने " सेना साहेब सुभा पराक्रम दर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्रीमंत राजे रघुजी भोसले यांच्या तलवारीचे लोकार्पण करतील. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृती कार्यमंत्री आशिष शेलार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. श्रीमंत मुधोजी राजे भोसले यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती असेल. दि. १८ ऑगस्ट रोजी, सायंकाळी ६ वाजता, प्रभादेवी इथल्या पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. सदर कार्यक्रमास इतिहास प्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, पुरातत्तव व वस्तुसंग्रहलयाचे संचालनालयचे संचालक तेजस गर्गे, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर यांनी केले आहे.