केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकारपरिषद; राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर येण्याची शक्यता

16 Aug 2025 17:49:13

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे आज, रविवारी दुपारी ३ वाजता पत्रकारपरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे आज नवी दिल्ली येथे पत्रकारपरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ वाजता ही पत्रकारपरिषद होणार आहे. आयोगातर्फे पत्रकारपरिषदेचा विषय जाहिर करण्यात आलेला नाही. मात्र, काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या कथित मतचोरीच्या आरोपांना आयोगातर्फे पुराव्यानिशी उत्तर दिले जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी रविवारपासूनच बिहारमध्ये व्होट अधिकार यात्रेस प्रारंभ करणार आहेत.


Powered By Sangraha 9.0