विधानभवन येथे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

15 Aug 2025 20:18:48

मुंबई : भारताच्या ७९व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विधान भवन येथे विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.

यावेळी विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे, सचिव मेघना तळेकर, सचिव डॉ.विलास आठवले, सचिव शिवदर्शन साठ्ये यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभापती राम शिंदे यांनी भारताच्या शूर सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत दहशतवाद्यांचे तळ उद्धस्त करत राबविलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' बद्दल भारतीय सैन्याचे अभिनंदन केले. तसेच भारताला सामर्थ्यशाली आणि वैभवशाली बनविण्याचा आपल्या सर्वांचा संकल्प सिद्धीस जावा अशी मनोकामना व्यक्त केली.


Powered By Sangraha 9.0