मुंबई (विशेष प्रतिनिधी) - हरियाणा येथे पार पडलेल्या २८ आठवड्यांचा स्निफर डाॅग प्रशिक्षण शिबिरामध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधील वनरक्षक सारिका जाधव यांनी प्रथम क्रमांक पटवला आहे (sahyadri tiger reserve). प्रशिक्षण पूर्ण करुन सारिका या ‘बेल्जियन शेफर्ड’ जातीचे श्वान घेऊन व्याघ्र प्रकल्पात रुजू झाल्या आहेत (sahyadri tiger reserve). यामुळे वन आणि वन्यजीव विषयक गुन्ह्याचा छडा लावण्यात मदत होणार आहे. (sahyadri tiger reserve)
इंडो तिबेटीयन सीमा सुरक्षा दलाकडून हरिणायातील पंचकुला येथे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी स्निफर डाॅग प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. २६ जानेवारी, २०२५ पासून सुरू झालेल्या या प्रशिक्षण शिबिरामध्ये अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगाना, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड आणि महाराष्ट्र या आठ राज्यांमधीव वनकर्मचारी दाखल झाले होते. डब्लूडब्लूएफच्या ट्रॅफिक इंडियामार्फत या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण देण्यात आले शिवाय ‘बेल्जियन शेफर्ड’ जातीचे १४ श्वान देखील उपलब्ध करुन देण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबिराकरिता सह्याद्री व्याघ्र राखीव मधून सारिका जाधव (वनरक्षक, फिरते पथक) यांना ‘मेन डॉग हंड्लेर आणि अनिल कुंभार (वनरक्षक, पाटण) यांना सहाय्यका 'डॉग हंड्लेर' म्हणून पाठवण्यात आले होते.
प्रशिक्षणादरम्यान घेण्यात आलेल्या श्वान प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षेत आठ राज्यांमधून सारिका जाधव यांनी प्रथम क्रमांक मिळवला. त्यानंतर १५ आगॅस्ट रोजी आणि त्याच्यासोबत 'बेल्जी' नावाचा श्वान कोल्हापूर येथे वन आणि वन्यजीव यांच्या संरक्षणासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात हजर झाले. ट्रॅफिक इंडिया ही वन्यजीव तस्करीवर देखरेख करणारी आघाडीची अशासकीय संस्था आहे.स्निफर डाॅग प्रशिक्षणादरम्यान बुद्धिमत्ता, चपळता आणि मजबूत कार्यनीती श्वांना ट्रॅकिंग, अवैध वस्तू, शिकारी शोधणे कामांसाठी योग्य बनवते. हे श्वान वृक्षतोड आणि संरक्षित प्राण्यांची तस्करी यासारख्या बेकायदेशीर गुन्हे शोध घेतात आणि गुन्हेगारीच्या घटनांच्या तपासात मदत करतात. तीव्र वास घेण्याच्या क्षमतेमुळे त्यांना ड्रग्ज, स्फोटके आणि वन्यजीव प्रतिबंधित वस्तूंसह विविध प्रकारच्या वस्तू शोधता येतात. ज्यामुळे ते विविध सुरक्षा कारवायांमध्ये मौल्यवान भूमिका बजावतात.
वन्यजीव गुन्हांमध्ये मदत
हे श्वान पथक कोल्हापूर विभागात कार्यरत झाले आहे. हे प्रशिक्षित श्वान वन व वन्यजीव संरक्षणात, विशेषतः अवैध वन्यजीव व्यापार रोखणे, शिकार प्रकरणांचा तपास व शोधमोहीम अशा कामांत महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. अशा अत्याधुनिक व प्रशिक्षित साधनसंपत्तीमुळे आमच्या विभागाची कार्यक्षमता आणि गती निश्चितच वाढेल. - तुषार चव्हाण, उपवनसंरक्षक/संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प