महामार्गासाठी आंबा घाट कापला; कापलेल्या कड्यावरुन कोसळून दोन गव्यांचा मृत्यू

    15-Aug-2025
Total Views |
indian gaur died



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
आंबा घाटातील ओझरे (कळकदरा) गावाजवळ महामार्गावर गुरुवार दि. १४ आॅगस्ट रोजी दोन गव्याचे मृतदेह आढळून आले (indian gaur died). कड्यावर कोसळून या गव्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाने वर्तवला आहे. सध्या आंबा घाटात नागपूर-मिऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून त्यासाठी कडे कापण्यात आले आहे (indian gaur died). त्यामुळे अशाच कापलेल्या कड्याचा अंदाज न आल्याने हे गवे खाली महामार्गावर कोसळून त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (indian gaur died)
 
गुरुवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास संगमेश्वर तालुक्यातील मौजे ओझरे बुद्रुक स्थानिक नाव कळकदरा येथे आंबा घाटाच्या सुरुवातीला दोन गवे मृतावस्थेत आढळले. महामार्गाच्या उजव्या बाजूला दोन गव्याचे मृतदेह पडल्याची माहिती रत्नागिरी वन विभागाला मिळाली. त्यानुसार जाऊन जागेची पाहणी केली असता घाटात खोदलेल्या कड्याच्या शेजारीच हे गवे पडलेले आढळले. वन विभागाने शवविच्छेदन करुन मृतदेहाची विल्हेवाट लावली. झुंजीदरम्यान कड्यावरुन कोसळून या गव्यांचा मृत्यू झाल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. मात्र, याठिकाणी अनियोजितरित्या कडा कापल्याने कड्यावरुन कोसळून गव्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता स्थानिक प्राणीप्रेमींनी व्यक्ती केली आहे.
 
नागपूर-मिऱ्या महामार्गासाठी आंबा घाटात विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात कडे कापण्यात आले आहे. हे कडे कापताना वन्यजीवांचा भ्रमणमार्गाचा विचार केला नसल्याची शक्यता स्थानिक प्राणीप्रेमींनी व्यक्त केली आहे. घाटातील धुक्यामुळे गव्यांना कड्याचा अंदाज आला नसावा आणि ते कड्यावरुन कोसळून पडल्याची शक्यता आहे.