मुंबई : श्री सिद्धिविनायक मंदिरात आज ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी ध्वजारोहण मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाला ट्रस्टी सौ. मीना कांबळी, महेश शेट्टी, गोपाल दळवी, महेश मुदलियार, कार्यकारी अधिकारी सौ. वीणा पाटील, पोलीस अधिकारी, ट्रस्टचे कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. सोहळ्यात धार्मिक वातावरण आणि उत्साहाचे विशेष दर्शन घडले.