रा.स्व.संघाला १०० वर्षांच्या समर्पणाचा इतिहास! : पंतप्रधान

15 Aug 2025 11:27:41

मुंबई  : "सेवा, समर्पण, संगठन, अप्रतिम अनुशासन ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख राहिली असून त्यास शंभर वर्षांच्या समर्पणाचा इतिहास आहे", असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून लाल किल्ल्यावर ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपले शताब्दी वर्ष साजरे करत असून येत्या विजया दशमीला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने पंतप्रधान मोदींनी संघाच्या १०० वर्षांच्या समर्पण भावनेचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, १०० वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेचा जन्म झाला. शंभर वर्ष राष्ट्राची सेवा ही गौरवाची बाब असून ते एक सूवर्ण पृष्ठ आहे. व्यक्तीनिर्माणापासून ते राष्ट्र निर्मिती पर्यंतचा संकल्प घेऊन लाखो स्वयंसेवकांनी मातृभूमीच्या कल्याणासाठी आपले जीवन समर्पित केले." १०० वर्ष राष्ट्रसेवेच्या यात्रेत आपले योगदान देणाऱ्या प्रत्येक स्वयंसेवकाचे पंतप्रधानांनी यावेळी स्मरण करून त्यांना अभिवादन केले.


Powered By Sangraha 9.0