बिहारममधील एसआयआर प्रक्रिया ‘मतदार - अनुकूल’ – सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

14 Aug 2025 13:12:01

नवी दिल्ली, बिहारमधील मतदार यादीच्या पुनरीक्षणात (एसआयआर) मतदारांकडून मागितलेल्या कागदपत्रांची संख्या ११ आहे, तर मतदार यादीच्या यापूर्वीच्या संक्षिप्त पुनरीक्षणात ७ कागदपत्रांचा विचार करण्यात आला होता. यावरून सध्याची एसआयआर प्रक्रिया मतदार-अनुकूल असल्याचे दिसून येते, असे निरिक्षण सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नोंदवले आहे.

सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्या. जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर बुधवारी बिहारमधील एसआयआर प्रकरणावर सुनावणी केली. यावेळी न्यायालयाने म्हटले की, राज्यात यापूर्वी केलेल्या संक्षिप्त एसआयआरमध्ये कागदपत्रांची संख्या सात होती आणि सध्याच्या एसआयआरमध्ये ती ११ आहे, जी मतदारासाठी योग्य किंवा वाजवी असल्याचे दर्शवते.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की मतदारांना यादीत समाविष्ट असलेल्या ११ कागदपत्रांपैकी कोणतेही एक सादर करणे आवश्यक आहे. आधार न स्वीकारणे अन्याय्य आहे असा याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद असला तरी इतर कागदपत्रांचे पर्याय देखील देण्यात आले होते. त्यामुळे ही प्रक्रिया प्रत्यक्षात सर्वांना सोबत घेऊन जाणारी अर्थात मतदार अनुकूल आहे आहे, अशी टिप्पणी न्यायालयाने केली.



Powered By Sangraha 9.0