जैसलमेर : (DRDO Guest House Spy Arrested) राजस्थानच्या जैसलमेरमधील चंदन फिल्ड फायरिंग रेज येथे असलेल्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (DRDO) गेस्ट हाऊसमधील व्यवस्थापक महेंद्र प्रसाद याला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली राजस्थान पोलिसांच्या गुप्तचर शाखेने हेरगिरीच्या आरोपाखाली मंगळवारी १२ ऑगस्ट रोजी अटक केली आहे.
महेंद्र प्रसाद असे या आरोपीचे नाव आहे. तो गेल्या ७ वर्षांपासून पोखरण फील्ड फायरिंग रेंजच्या गेस्ट हाऊसमध्ये कार्यरत होता. तो मूळचा अल्मोडा (उत्तराखंड) येथील रहिवासी आहे. पाकिस्तानच्या आयएसआय संघटनेसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली आठवड्याभरापूर्वीच महेंद्रला ताब्यात घेण्यात आले होते. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी जयपूर येथे केलेल्या संयुक्त चौकशीत महेंद्र सिंहचा हेरगिरीतील सहभाग स्पष्ट झाल्यामुळे कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
जयपूरच्या केंद्रीय चौकशी केंद्रात विविध गुप्तचर संस्थांनी महेंद्र सिंहची चौकशी केली. तसेच त्याच्या मोबाइल फोनची तांत्रिक तपासणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये डीआरडीओ आणि भारतीय सैन्याशी संबंधित संवेदनशील माहिती त्याने पाकिस्तानी हँडलर्सबरोबर शेअर केल्याचे सिद्ध झाले.