पुण्यात कुंडेश्वर दर्शनाला जाणाऱ्या पिकअपचा अपघात; ७ महिला भाविकांचा मृत्यू

11 Aug 2025 16:17:04

पुणे: (Pune Khed Pickup Tempo Accident) पुणे जिल्ह्यातून भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. खेड तालुक्यातील कुंडेश्वर दर्शनाला जाणाऱ्या पिकअप टेम्पोचा अपघात झाला असून या दुर्दैवी घटनेत ७ महिला भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर, १५ ते २० महिला भाविक जखमी झाल्या आहेत.  दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रावण सोमवारनिमित्त ३५ महिला भाविक या पिकअप टेम्पोतून श्री क्षेत्र कुंडेश्वर येथे दर्शनासाठी जात होत्या. प्रवासादरम्यान एका नागमोडी वळणावर घाट चढताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप जीप पाच ते सहावेळा पलटल्यानंतर थेट खोल दरीत कोसळली. या पिकअपमधून प्रवास करणाऱ्या महिला भाविकांपैकी ७ महिलांचा मृत्यू झाला असून इतर महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

जखमींना खासगी रुग्णालयात व चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती असून जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे.



Powered By Sangraha 9.0