मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश झाला. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर जगभरातील शिवप्रेमींसाठी ही आनंदाची गोष्ट होती. अशातच आता या १२ किल्ल्यांची महती सांगणारा एक आगळा वेगळा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे.
विलेपार्ले सांस्कृतिक केंद्राच्या माध्यमातून सोमवार दि. ११ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६:१५ वाजता मास्टर दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले पूर्व येथे "शिवदुर्गाची UNSCO भरारी" या आगळ्या वेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत लोकप्रिय व ज्येष्ठ इतिहास व दुर्ग अभ्यासक पराग लिमये हे बाराही शिवदुर्गाची युद्धनीतीच्या दृष्टिकोनातून महती कथन करतील. त्याचबरोबर शिवरायांच्या अपूर्व अशा कर्तृत्व, शौर्य व नीती यांच्याशी निगडित लोकप्रिय शिवस्फूर्ती गीतं काव्या खेडेकर अथर्व कर्णिक, वैदेही परांजपे, हर्षवर्धन गोरे, प्राजक्ता रानडे, अर्चना गोरे, मंदार आपटे, ऋषिकेश रानडे, मिलिंद करमरकर आदी गायक सादर करणार आहेत. सदर कार्यक्रम शिवप्रेमींसाठी निशुल्क असून इच्छुकांनी ९०८२०७८९६८ या संपर्कक्रमांकावर संपर्क कारावा. त्याच बरोबर सदर कार्यक्रमाला शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे आमदार पराग अळवणी यांनी केले.