मुंबई, साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दि. १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:३० वाजता माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर येथे हा कार्यक्रम पार पडणाक आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे भूषवणार आहेत. ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यावेळी श्रोत्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी अशोक हांडे यांचा आचार्य अत्रे पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाअंतर्गत " झेंडुची फुले " या काव्य आणि विडंबन काव्याच्या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमात कौशल इनामदार, रामदास फुटाणे, महेश केळुस्कार, कौशल ईनामदार, निनाद आजगांवकर, मैथिली पानसे जोशी, शिवानी गायतोंडे आदी मान्यवार सहभाग नोंदवणार आहे. सदर कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका थिएटरवर उपलब्ध असून, रसिकांनी त्यांचा लाभ घ्यावा.