‘ट्वेल्थ फेल’ ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा

01 Aug 2025 21:33:08

- मराठीत ‘श्यामची आई’ सर्वोकृष्ट

- शाहरूख खान आणि राणी मुखर्जी ठरले सर्वोत्तम अभिनेता व अभिनेत्री

- ‘केरला स्टोरी’साठी सुदिप्तो सेन यांना ‘सुवर्णकमळ’

नवी दिल्ली:  केंद्र सरकारच्या ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची शुक्रवारी सायंकाळी घोषणा झाली. ‘ट्वेल्थ फेल’ हा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला आहे. मराठीत ‘श्यामची आई’ हा सिनेमा सर्वोत्कृष्ट ठरला आहे. त्याचवेळी सर्वोत्तम अभिनेता हा पुरस्कार शाहरूख खान, आणि विक्रांत मेस्सीह यांना विभागून आणि राणी मुखर्जी यांना सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार जाहिर झाला आहे.

७१ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. शाहरुख खान यांना 'जवान' चित्रपटासाठी आणि विक्रांत मेस्सीह यांना ‘ट्वेल्थ फेल’ चित्रपटासाठी संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे. मराठी चित्रपटांसाठी 'श्यामची आई' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यासोबतच नाळ-2 चित्रपटातील भार्गव जगतापला सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा पुरस्कार मिळाला आहे. राणी मुखर्जी यांना 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची यादी

सर्वोत्कृष्ट अभिनेता- शाहरुख खान (जवान) आणि विक्रांत मॅसी (ट्वेल्थ फेल)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- राणी मुखर्जी (मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- सुदीप्तो सेन (द केरला स्टोरी)

सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म- ट्वेल्थ फेल

सर्वोत्कृष्ट स्टंट नृत्यदिग्दर्शन- हनुमान (तेलुगु)

ॲनिमेशनमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट - हनुमान (तेलुगु)

सर्वोत्कृष्ट मनोरंजन - (रॉकी और रानी की प्रेम कहानी)

सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन- रॉकी और रानी की प्रेम कहानी (धिंडोरा गाण्यासाठी)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- विजयराघवन (पुक्कलम), मुथुपेटाई सोमू भास्कर (पार्किंग)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- उर्वशी (उलोझुकू), जानकी बोडीवाला (वश)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - पीव्हीएम एस रोहित (बेबी)

सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका - शिल्पा राव (जवानमधील चलेया गाण्यासाठी)

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी- द केरला स्टोरी

सर्वोत्कृष्ट संवाद लेखक- सिर्फ एक बंदा काफी है

सर्वोत्तम मेकअप- सॅम बहादूर

पार्श्वसंगीताचे सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन- एनिमल

सर्वोत्तम ध्वनी डिझाइन- एनिमल

सर्वोत्तम संगीत दिग्दर्शन- वाथी

राष्ट्रीय, सामाजिक आणि पर्यावरणीय समस्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट- सॅम बहादूर

सर्वोत्तम पटकथा- बेबी (तेलगू), पार्किंग (तमिळ)

सर्वोत्तम निर्मिती डिझाइन- २०१८- एवरीवन इज अ हीरो (मल्याळम)

सर्वोत्तम गीत- बालागम (तेलगू)
Powered By Sangraha 9.0