पनवेल : लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त जागृती फाऊंडेशनच्या वतीने रविवार दिनांक ०३ ऑगस्ट रोजी पनवेलमध्ये मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
शहरातील साईनगर मधील श्री साई गणेश मंदिर येथे सकाळी ९ वाजता या शिबिराला सुरुवात होणार असून शिबिरात रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन, नेत्र, त्वचा, केस, दातांची तपासणी या शिबिरात होणार आहे. यासाठी डॉ. के. सी. डायग्नोसिस, माजी नगरसेवक श्रीकांत ठाकूर, श्री साई ब्लड बँक यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. या शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जागृती फाऊंडेशनचे अध्यक्ष व सा. पनवेल युवाचे संपादक निलेश सोनावणे यांनी केले आहे.