नागपूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दाखविलेल्या वंचितांच्या विकासाच्या मार्गावर राज्य शासन चालण्याचा प्रयत्न करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, १ ऑगस्ट रोजी व्यक्त केला.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नागपूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात असलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या गीतांनी ज्वलंत ठेवले आणि वंचितांचा आवाज समाजामध्ये पोहोचवण्याचे महत्वपूर्ण काम त्यांनी केले. पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर नाही तर कामगाराच्या तळहातावर उभी आहे, असा संदेश त्यांनी आपल्या साहित्यातून दिला. त्यांनी दाखवविलेल्या वंचितांच्या विकासाच्या मार्गावर चालण्याचा राज्य शासन प्रयत्न करेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.