नवी दिल्ली : (ECI announces schedule for Vice President's Election) उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर आता ९ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे. मतदानानंतर त्याच दिवशी म्हणजे ९ सप्टेंबरलाच लगेच निकाल जाहीर होणार आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार ७ ऑगस्ट रोजी या निवडणुकीसाठी अधिसूचना जाहीर होणार आहे. तर २१ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीची शेवटची तारीख २५ ऑगस्ट असेल. ९ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार असून, सकाळी १० ते संध्याकाळी ५ ही मतदानाची वेळ असेल. तसेच मतदान आटोपल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होणार आहे.