मुंबई: आजपासून ऑगस्ट महीना सुरू झाला. या महिन्यात राज्यातील बँका तब्बल १४ दिवस बंद राहणार आहेत. या महिन्यातील ५ रविवार आणि दुसऱ्या - चौथ्या शनिवार व्यतिरिक्त वेगवेगळ्या ७ दिवसांसाठी बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. दरम्यान १५,१६,१७ असे सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत.
जर का तुम्हाला या महीन्यात बँकेंशी संबधित कोणतेही महत्वाचे काम असल्यास तुम्ही या १४ सु्ट्ट्या सोडून बँकेत जाऊ शकता, दरम्यान, ऑगस्ट महिन्यात येणारे अनेक सण हे या सुट्यांमागील महत्वाचे कारण आहे. परंतू, तुम्ही तुमचे काम ऑनलाइन बँकिंगद्वारे करू शकता.
बँक सुट्ट्या असूनही तुम्ही ऑनलाइन बँकिंग आणि एटीएमद्वारे पैश्यांचा व्यवहार किंवा इतर कोणतेही बँक संबधित कामे करू शकता. बँकने आधीच जाहीर केल्याप्रमाणे ऑनलाइन बँकिंग सुविधांवर बँक सुट्ट्यांचा कोणताही परिणाम होणार नाही.