डोंबिवली एमआयडीसीत व्हॉल्व गळतीमुळे पाणी वाया

09 Jul 2025 17:28:44

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी मध्ये पाण्याच्या पाईपलाईन व्हॉल्ववर अनेक ठिकाणी पाणी गळती होत आहे. यामुळे करोडो लीटर पाणी वाया जात आहे. वारंवार पाणी गळती होत असून प्रशासनाकडून मात्र कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले आहे.

एमआयडीसीतील विको नाका आणि पीएनजी गॅलरीआ शॉपींग कॉम्प्लेक्स जवळ गेल्या दोन दिवसांपासून पाणी गळती सुरू आहे. तसेच एमआयडीसी फेज एक व दोन मध्ये अशाच पध्दतीने व्हॉल्ववर काही ठिकाणी पाण्याची गळती चालू असल्याचे दिसून येत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. एमआयडीसी प्रशासनाला याबाबत तक्रार करून ही कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. केवळ तात्पुरती दुरूस्ती केली जाते. दरम्यान पाण्याचा प्रेशर वाढल्याने व्हॉल्व मधून गळती सुरू होते. तसेच काही समाजकंटक या पाईपलाईन व्हॉल्ववर छेडछाड करतात असे एमआयडीसी अधिका:यांनी सांगितले.


Powered By Sangraha 9.0