आमदार निवासात राडा! आमदार संजय गायकवाडांकडून कर्मचाऱ्याला मारहाण; काय घडलं?

09 Jul 2025 12:42:54

मुंबई : शिळे आणि निकृष्ट जेवण दिल्याचा आरोप करत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. मंगळवार, ८ जुलै रोजी हा प्रकार घडला असून या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

मंगळवारी रात्री आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासात जेवणाची ऑर्डर दिली. त्यानुसार त्यांना त्यांच्या रूममध्ये जेवण देण्यात आले. मात्र, या जेवणातील डाळ आणि भात शिळे असून त्याचा वास येत असल्याचा आरोप त्यांनी केला.

त्यानंतर संजय गायकवाड यांनी थेट आमदार निवासातील कॅन्टीन गाठत तिथल्या व्यवस्थापकाला जाब विचारला. तसेच तिथल्या एका कर्मचाऱ्याला मारहाणही केली. आमदार निवासात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये आमदार संजय गायकवाड एका कर्मचाऱ्याला मारहाण करताना दिसत आहेत.


Powered By Sangraha 9.0