आमदार संजय गायकवाड यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कडक शब्दांत समज

09 Jul 2025 19:32:13

 मुंबई
 : आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये शिळे अन्न दिल्याप्रकरणी मारहाण करणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांना शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडक शब्दांत समज दिली आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने रितसर तक्रार करता आली असती,पण मारहाणीचे समर्थन करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.आमदार संजय गायकवाड यांना आमदार निवासमधील कॅन्टीनचे निकृष्ट जेवण खाल्ल्याने उलटी झाली होती. इतरांना त्रास होऊ नये यासाठी आमदार गायकवाड यांनी त्वरीत कॅन्टीनमध्ये धाव घेत अन्नाच्या दर्जाबाबत चौकशी केली. याबाबत उपमुख्यमंत्री म्हणाले की, संजय गायकवाड यांनी केलेली मारहाण समर्थनीय नाही. लोकप्रतिनिधी या नात्याने अन्नाच्या दर्जाबाबत रितसर तक्रारी करुन त्यावर कायदेशीर कारवाई करता येऊ शकते, पण मारहाण करणे हा पर्याय असू शकत नाही. संजय गायकवाड यांना समज दिली असून असे करणे योग्य नाही, आम्ही याचं समर्थन करत नाही" हे सांगितल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
Powered By Sangraha 9.0