छत्रपती संभाजीनगर : दत्ताजी भाले सभागृह, छत्रपती संभाजीनगर येथे किन्नर समुदायाच्या हितासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत समुदायाच्या समस्या, उपाययोजना आणि भावी कामकाजावर चर्चा झाली. याच वेळी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर “किन्नर विकास परिषद, देवगिरी प्रांत” या नव्या परिषदेच्या डिजिटल फलकाचे अनावरण करण्यात आले.
किन्नर समाजाच्या विकास, सक्षमीकरण आणि समस्या निवारणासाठी या परिषदेच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात येणार आहे. अनावरण सोहळ्यात समुदायासाठी एकजुटीचा आणि सकारात्मक बदलाचा संदेश दिला गेला.
कार्यक्रमासाठी हरीष कुलकर्णी, प्रसन्न कुमार बोठे, डॉ. प्रतीभा फाटक, ॲड. प्रिया भारसवाडकर, नांदेड येथील नायक रंजना गुरु, फरिदा बकश, बिजली बकश, रेश्मा इटके, अर्पिता भिसे, श्रीदेवी शिंदे, डॉ. निखील आठवले, अमरदीप गोधने, गणेश पांचाळ, रोहित दुशी, विजय गव्हाणे आणि अशोक गिरी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत सर्वानुमते फरिदा बकश यांची संयोजक म्हणून निवड करण्यात आली, तर रेश्मा इटके यांची सहसंयोजक म्हणून निवड झाली. उपस्थित मान्यवरांनी पुढील कामासाठी दोघींना शुभेच्छा दिल्या.