साताऱ्यातील आंधळी बोगद्याचे अस्तिरकरणाचे काम १६ दिवसात पूर्ण; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

08 Jul 2025 18:43:38

मुंबई : सातारा जिल्ह्यातील कै. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना प्रकल्पांतर्गत आंधळी बोगद्याचे अस्तरीकरण करण्याचे काम फक्त १६ दिवसांत पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार, ८ जुलै रोजी विधान परिषदेत दिली.

विधान परिषद सदस्य शशिकांत शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात हा प्रश्न विचारला होता. यावर बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "बोगद्याचे काम करताना संबंधित विभागाच्या सर्व परवानग्या मिळाल्या असून याबाबत कोणत्याही तक्रारी प्राप्त झाल्या नाही. तसेच या १६ दिवस चाललेल्या क्रशरसाठी ५ लाख २४ हजार ८८ रुपये आणि त्यानंतर ५ लाख ६९ हजार ६०० आणि ६५ हजार रुपयांची रॉयल्टी भरली गेली आहे," असे त्यांनी सांगितले.


Powered By Sangraha 9.0