मराठीच्या मुद्द्यावर मनसे पुन्हा आक्रमक! मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा; अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात

08 Jul 2025 12:33:11

मुंबई : मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवार, ८ जुलै रोजी मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा आयोजित केला होता. पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही हा मोर्चा काढण्यात आल्याने आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात धरपकड सुरू आहे.

पोलीस प्रशासनाने पहाटे मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पहाटे साडेतीनच्या सुमारास काशिमीरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता बालाजी हॉटेलपासून या मोर्चाला सुरुवात होणार होती. मात्र, या मोर्चापूर्वीच मनसे आणि उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटीसा बजावण्यात आल्या होत्या.

तरीसुद्धा मनसैनिक आंदोलन करण्यावर ठाम होते. दरम्यान, सध्या आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात धरपकड सुरू असून अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे. मीरा- भाईंदर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.



Powered By Sangraha 9.0