आधी त्या शेखच्या कानाखाली वाजवा, मग आपण...; मंत्री नितेश राणेंचा मनसेवर टीका

08 Jul 2025 17:11:58


मुंबई : आधी त्या शेखच्या कानाखाली वाजवा आणि मग आपण हिंदी सक्तीबद्दल चर्चा करू, अशी टीका मंत्री नितेश राणे यांनी मनसेवर केली आहे. मनसे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहिल शेख हा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असून त्याने एका महिलेला शिवीगाळ केल्याची घटना घडली.


यावर बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, "तुम्ही अन्य गरीब हिंदूंवर सक्ती करता. पण तो कोणीतरी शेख तुमच्या पक्षाचा आहे त्याला कधी कानफडीत मारणार? तो शेख तुमच्या पक्षात असला तरी त्याला वेगळा न्याय आहे का?" असा सवाल त्यांनी केला.


ते पुढे म्हणाले की, "गोल टोपी आणि दाढीवाले लोक कधीही मराठी बोलत नाहीत. मग न्याय फक्त गरीब हिंदूंनाच का लागतो? त्यामुळे आधी त्या शेखच्या कानाखाली वाजवा आणि मग आपण मराठीच्या सक्तीबद्दल चर्चा करू," असेही ते म्हणाले.


खासदार निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, "आपण कुणीही हिंदू म्हणून जिहाद्यांच्या ट्रॅपमध्ये येऊ नये. हिंदूंनी आपापसात भांडावे हीच त्यांची ईच्छा आहे. हिंदू राष्ट्र तोडण्याचा त्यांचा मनसुबा आहे. त्यामुळे कोणीही हिंदू हिंदूंमध्ये न भांडता आपण एकत्रितपणे हिंदू राष्ट्र भक्कम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा. इस्लाम राष्ट्र वाढवण्यासाठी आपण खतपाणी घालू नये, अशी विनंती मी समस्त हिंदू समाजाला करतो," असेही मंत्री नितेश राणे म्हणाले.


Powered By Sangraha 9.0