नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये बिहारमधील महिलांना सरकारी ३५ टक्के आरक्षण देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली बिहार मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत बिहार राज्यातील सर्व स्तरांवर आणि सर्व सरकारी सेवा व संवर्गांमध्ये सर्व प्रकारच्या पदांवर थेट भरतीमध्ये राज्यातील मूळ रहिवासी असलेल्या महिला उमेदवारांना ३५ टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव देखील मंजूर करण्यात आला. म्हणजेच, महिला आरक्षणात अधिवासाची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार आता कोणत्याही सरकारी नोकरीसाठी थेट भरतीमध्ये ३५ टक्के जागा बिहारमधील महिला उमेदवारांसाठी राखीव असतील.