हिमाचल प्रदेश: मॅकलिओडगंज येथील त्सुगलाखांग मंदिरात दलाई लामा यांच्या ९० व्या वाढदिवसापूर्वी दीर्घायुष्य प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उत्तराधिकार्याबाबत उत्तर देताना ते म्हणाले की बोधिसत्व अवलोकितेश्वर यांचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे. अनेक भाकितं आणि संकेतांच्या आधारे, मी १३० वर्षांपर्यंत जिवंत राहील, असा मला पूर्ण विश्वास आहे. आशा आहे की, आपण आणखी ३० ते ४० वर्ष जगू आणि लोकांची सेवा करत राहू. त्यामुळे उत्तराधिकार्याबदद्ल सध्या काहीही निर्णय घेतला नाही. या कार्यक्रमाला १५००० पेक्षा जास्त लोक उपस्थित होते