शिक्षक परिषदेच्या राज्य शाखेचे पालकत्व मंत्री पंकज भोयर यांनी स्वीकारले

    06-Jul-2025   
Total Views |


मुंबई : अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या शिष्टमंडळाने नुकतीच राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची भेट घेतली. यावेळी शिक्षकांच्या निवेदनावरील विविध प्रश्नांवर व शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा केली आणि संघटनेचे पालकत्व स्वयंप्रेरणेने स्वीकारण्याबाबत विश्वास दर्शविला.


ते म्हणाले, शिक्षक परिषद हे राष्ट्रीय विचारांचे संघटन असल्याने या संघटनेचे पालकत्व स्वयंप्रेरणेने स्वीकारण्यास मला अत्यंत आनंद असून राज्यात शिक्षक परिषदेच्या संघटनात्मक वाढीसाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करावे व यासाठी आवश्यक ते सहकार्य मी करीन. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी व पटसंख्या वाढीसाठी परिषदेने उपक्रम हातात घ्यावे, असे आवाहन सुद्धा त्यांनी केले.


शिष्टमंडळात प्रांताध्यक्ष मधुकर उन्हाळे, प्रांत कार्यवाह पुरुषोत्तम काळे, प्रांत कोषाध्यक्ष अविनाश तालापल्लीवार, प्रांत कार्याध्यक्ष मच्छिंद्र गुरमे, प्रांत महिला आघाडी प्रमुख वैशाली काकडे, प्रांत सहकार्यवाह नितीन पवार, प्रांत महिला आघाडी सहप्रमुख सुरेखा ताजवे, नागपूर विभाग कार्यवाह विजय साळवे, छत्रपती संभाजी नगर जिल्हाध्यक्ष देविदास सांगळे, जिल्हा कार्यवाह साईनाथ भालेराव आदींचा सहभाग होता.



ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक