बिर्ला महाविद्यालय मध्ये आषाढी एकादशी, निमित्त ज्ञानदिंडी संपन्न

    06-Jul-2025   
Total Views |

कल्याण
: निसर्ग संवर्धन आणि स्वच्छतेची जाणीव असलेल्या श्री विठोबा-रुक्मिणीच्या भक्तीवर आधारित ज्ञान दिंडी रविवारी सकाळी काढण्यात आली होती. निमित्त होते ते आषाढी एकादशी चे.

कल्याण चॅरिटेबल ट्रस्ट, सेंच्युरी रेयान, बी.के. बिर्ला महाविद्यालय, बी.के. बिर्ला नाईट कॉलेज, बी.के. बिर्ला पब्लिक स्कूल आणि सेंच्युरी रेयान हायस्कूल यांनी आषाढी एकादशी निमित्त भव्य ज्ञान दिंडीचे आयोजन केले होते. ही यात्रा कल्याण येथील बिर्ला महाविद्यालयाच्या प्रांगणातून सुरु होऊन शहाड येथील विठ्ठल मंदिरात तिचा समारोप झाला. या ज्ञानदिंडीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुरूवात झाली.‌ त्यांनी विठ्ठल भक्तांना संबोधित करताना सांगितले, उपमुख्यमंत्र्यांनी संत ज्ञानेश्वर आणि वारकरी संप्रदायाचे महत्त्व सांगितले. पर्यावरण संवर्धनावर लक्ष केंद्रित करून आयोजित केलेल्या या ज्ञान दिंडीला ज्ञानेश्वरांच्या परंपरेशी जोडत त्यांनी महाविद्यालय परिवाराचे कौतुक केले.

या यात्रेत रथावर विराजमान विठ्ठल आणि रुक्मिणीने सजवलेला रथ, पालखी, ढोलकी, लेझीम पथक आणि झांज पथक, वारकरी भजनी मंडळ विद्यार्थी या ज्ञान दिंडीत सहभागी झाले होते अशा भक्तिमय वातावरणात ज्ञानदिंडी आयोजन करण्यात आले होते. भजन मंडळी वारकरी विठ्ठल अभंगाच्या तालावर भक्तिमय वातावरणात नाचत होते. या ज्ञानदिंडीत जवळपासच्या शैक्षणिक संस्था आणि सामाजिक कल्याणकारी संस्थांमधील हजारो वारकरी भाविक सहभागी झाले होते. महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ओ.आर. चितलांगे यांच्या मार्गदर्शनाखाली २०१६ पासून ही ज्ञान दिंडी यात्रा आयोजित केली जात आहे. शहाड येथील विठ्ठल मंदिरात भगवान विठ्ठलाची आरती आणि प्रसाद वाटपाने या या ज्ञानदिंडीचा समारोप झाला.

यावेळी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार विश्वनाथ भोईर, कुमार आयलानी, सुलभा गायकवाड, नरेंद्र पवार, प्रकाश भोईर, प्रमोद हिंदूराव, महाविद्यालयीन शिक्षण संचालक डॉ. नरेश चंद्र, प्राचार्य डॉ. अविनाश पाटील, डॉ. हरीश दुबे, सुबोध दवे आणि सेंच्युरी रेयॉन युनिटचे प्रमुख दिग्विजय पांडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ओ. आर. चितलांगे यांनी उपमुख्यमंत्र्यांना रुक्मिणी-विठोबाची मूर्ती, शाल, नारळ आणि तुळशीचे रोप देऊन सन्मानित केले.‌