सनातन संस्कृती भारताचा आत्मा असून ती अखंड व अविनाशी आहे : आरिफ मोहम्मद खान
05 Jul 2025 20:19:31
मुंबई : "सनातन संस्कृती भारताचा आत्मा असून ती अखंड व अविनाशी आहे", असे प्रतिपादन बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी केले. मुजफ्फरपूर येथील एका महाविद्यालयाच्या १२६ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या प्रमुख उपस्थितीत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी 'शायनिंग इंडिया टू अमृत काल : टूवर्ड्स अँड एम्पॉवर्ड एण्ड विकसित भारत' या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.
उपस्थितांना संबोधत पुढे ते म्हणाले, 'भारतीय संस्कृती धर्म, जात किंवा पंथाच्या आधारावर भेदभावाचे समर्थन करत नाही. धर्म, संस्कृती, चालीरीती आणि खाण्याच्या सवयी वेगवेगळ्या असूनही, सर्व भारतीय नागरिक एक आणि समान आहेत. भारताची ओळख त्याच्या बौद्धिक आणि सांस्कृतिक संपत्तीमुळे होते. भारताने जगाला ज्ञान दिले. जगातील इतर संस्कृती इतर कारणांसाठी प्रसिद्ध आहे, परंतु भारतीय संस्कृतीत सातत्य आहे आणि ती तिच्या ज्ञान आणि एकतेसाठी विश्वात प्रसिद्ध आहे. '
यावेळी उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा, केंद्रीय मंत्री डॉ. राजभूषण चौधरी, कुलगुरू प्रा. दिनेश चंद्र राय, प्राचार्य ओम प्रकाश राय आणि इतर मान्यवर उपस्थित होते.