जालना : मुलीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या वडिलांनाच बेदम माराहाण झाल्याची घटना जालना शहरात घडली. जालन्यातील यमुना रेसिडन्सीमध्ये हा संतापजनक प्रकार उघडकीस आला. मुलीची छेड काढणारे हे स्थानिक वाळू माफीया असल्याचा आरोप पीडितांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या वडीलांचा संताप होऊन ते छेड काढणाऱ्या वाळू माफियांना जाब विचारण्यासाठी गेले असता समोरील व्यक्तीने त्यांना मारहाण करण्यास सुरू केली.
चंदझिरा पोलिसांनी या प्रकरणातील नऊ वाळू माफियांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील दोघांना अटक झाली असून उर्वरीत 7 आरोपी सध्या फरार आहेत. चंदझिरा पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरु आहे.