बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांकरता मेगा भरती!

    05-Jul-2025
Total Views |
 
Bank of Baroda Mega Recruitment
 
 
मुबंई : बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांकरता भरती प्रक्रिया सुरू असून या संबधितची अधिकृत माहिती बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जुलै २०२५ आहे.
 
स्थानिक बँक अधिकारी पदांकरता एकूण रिक्त जागा : 2500
 
स्थानिक बँक अधिकारी पदांकरता अर्जदाराचे वय 1 जुलै 2025 तारखेपर्यंत 21 ते 30 वर्षे असणे आवश्यक आहे. दरम्यान आरक्षित श्रेणीतील उमेदवारांकरता वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
 
पदांकरता अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्याही विद्यापीठ/संस्थेतून कोणत्याही विषयातील पदवीधर असणे अनिर्वाय आहे. चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट, अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय क्षेत्रात व्यावसायिक पात्रता असलेले इच्छुक उमेदवारसुद्धा अर्ज करू शकतात.
 
अर्ज शुल्क
 
या अर्ज प्रक्रियेसाठी सामान्य open आणि OBC गटातील अर्जदारांना 850/- रुपये शुल्क तर महिला उमेदवार आणि SC, ST गटातील अर्जदारांना 175/- रुपये शुल्क भरावे लागणार आहे. बँकेकडून अर्ज भरण्याची संपूर्ण पद्धत ऑनलाइन ठेवण्यात आली आहे.
 
भरतीसाठीचा अर्ज कसा करावा?
 
बँकेंच्या अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर गेल्यावर, बँक ऑफ बडोदा LBO नोंदणी 2025 लिंकवर क्लिक करा. लॉगिन करून आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.