रायगड, कष्टकरी समाजातही उच्च शिक्षणाचा टकका वाढावा यासाठी यासाठी कोकण कला व शिक्षण विकास संस्था काम करते. त्या अनुषंगानेच या संस्थेच्य माध्यमातून प्रत्येक शैक्षणिक वर्षात हजारो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचे उपक्रम राबविला जातो. या वर्षी रूपेन तन्ना मेमोरियल ट्रस्ट यांच्या आर्थिक सहकार्याने रोहा, रायगड येथे आठशेहूहून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. असे प्रतिपादन कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनीं केले. शैक्षणिक साहित्य वितरणाच्या रोहा येथिल कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी ऍडव्होकेट उषा तन्ना , ऍडव्होकेट विजय हरळकर, कोकण संस्थेचे प्रकल्प समन्वयक संदेश गायकवाड ,विश्वनाथ जाधव, अविनाश कान्हेकर, संदेश शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती त्याच बरोबर श्रमिक विद्यालय चिल्हे - दीपक जगताप व नंदकुमार मरवडे, १००% आदिवासी असलेल्या न्यू इंग्लिश स्कूल विठ्ठलवाडीचे गौतम जाधव व संदेश शिर्के, रा.ग पोटफोडे मास्तर विद्याला खांबचे - सुरेश जंगम व राजेश म्हात्रे, जिल्हा परिषद शाळा देवकान्हेचे विठ्ठल हाके, जिल्हा परिषद शाळा देवकान्हे आदिवासी वाडीचे - सुरेश राठोड हे शिक्षक उपस्थित होते.ऍडव्होकेट उषा तन्ना यांनी जमलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.