मुंबई, कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून सुनील नारकर यांनी पदभार स्वीकारला आहे. सुनील नारकर हे कणकवली तालुक्यातील पियाळी गावचे आहेत. या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. नारकर हे सन १९९७ मध्ये कोकण रेल्वेमध्ये रत्नागिरीत क्षेत्रीय ट्रॅफिक व्यवस्थापक पदावर रुजू झाले. त्यानंतर त्यांनी मडगाव येथे वरिष्ठ क्षेत्रीय वाहतूक व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. पुढे बेलापूर येथे कोकण रेल्वे मुख्यालयामध्ये मुख्य वाणिज्य प्रबंधक म्हणून त्यांनी यशस्वी कामगिरी बजावली. आता पदोन्नतीने त्यांची कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.