येत्या ५ जुलै रोजी SNDT महिला विद्यापीठाचा ११० वा वर्धापन दिन!

    04-Jul-2025   
Total Views |

मुंबई : श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचा ११० वा वर्धापन दिन समारोह शनिवार, ५ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या चर्चगेट प्रांगणातील सर सीताराम आणि लेडी शांताबाई पाटकर सभागृहात सकाळी ११.०० हा कार्यक्रम पार पडणार आहे.

देशातील स्त्रियांसाठी आणि संपूर्ण भारतीय समाजासाठी स्त्री शिक्षणातील विद्यापीठाचे ११० वर्षांचे महत्वपूर्ण योगदान आहे. १९१६ पासून या विद्यापीठाने लाखो स्त्रीयांना शिक्षित केले आहे. सध्या ८५ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी विद्यापीठाच्या ३९ विभाग, १६ संस्था आणि ३८१ संलग्न महाविद्यालयांमध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी नोंदणी केली आहे. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या प्रेरणेतून निर्माण झालेल्या आणि ‘संस्कृता स्त्री पराशक्ती’ हे बोधवाक्य असलेल्या या विद्यापीठाचे शिक्षणातून महिला सक्षमीकरण हे ध्येय आहे.

यावर्षी राज्यपाल शसी. पी. राधाकृष्णन हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील. तसेच प्रमुख अतिथी म्हणून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहतील. फ्लुकोनाझोल बोर्ड ऑफ गव्हर्नर्स, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे संस्थापक डॉ. संजय इनामदार, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) चे सल्लागार डॉ. ज्ञानेश्वर मुळे हे या कार्यक्रमाचे अतिथी म्हणून उपस्थित राहतील.

तसेच यावर्षीही या कार्यक्रमात विद्यापीठातील अध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांस ‘महर्षी कर्वे उत्कृष्ट शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार’ देण्यात येईल. याच समारोहात जीवनातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगीरी करणाऱ्या चार माजी विद्यार्थिनींना सन्मानित केले जाईल.

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....