पाताळगंगेतील औद्योगिक संघटनेची महावितरणसोबत संयुक्त बैठक

04 Jul 2025 21:05:04

मुंबई, महावितरणच्या नवनवीन उपक्रमाबाबत माहिती देण्यासाठी तसेच औद्योगिक संघटनांच्या वीज संबंधी समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी दि. १ जुलै २०२५ रोजी महावितरण व पाताळगंगा येथील औद्योगिक ग्राहकांचे प्रतिनिधी एपीएमए (अतिरिक्त पाताळगंगा मॅन्युफॅक्चरिंग संघटना) व पीआरआयए (पाताळगंगा-रसायनी औद्योगिक संघटना) यांची संयुक्त बैठक संपन्न झाली.

या बैठकीत, महावितरण भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता संजय पाटील, पेण मंडळाचे अधीक्षक अभियंता धनराज बिक्कड, कार्यकारी अभियंता, पनवेल (ग्रा.) विभाग व्ही.एम.शिंदे उपस्थित होते. मे. व्हीलाईट फर्निटेक, पाताळगंगा या कंपनीच्या दालनात संपन्न झाली. यावेळी पाताळगंगा-रसायनी औद्योगिक क्षेत्रातील वीज ग्राहकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा झाली.

महावितरणचे मुख्य अभियंता संजय पाटील यांनी अधिकाऱ्यांना देखभाल दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करून ग्राहकांना अखंडीत व योग्य दाबाने वीज पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. तसेच ग्राहकांचे ग्रुप तयार करून त्यांना एसएमएसद्वारे संवाद साधण्यास सांगितले. रोहित्रे चोरी रोखण्यासाठी कंपन्यांनी त्यांचे सीसीटीव्ही चे कॅमेरे रोहित्राकडे वळवण्यासाठी सुचना केल्या. तसेच एमआयडीसी व महावितरणच्या अधिकाऱ्यांना समन्वय राखण्यास सांगितले. एमआयडीसी व इतर विभागामार्फत कामाच्या दरम्यान भूमिगत वाहीन्यांना होणारे नुकसान टाळण्याकरिता समन्वय साधण्याचे निर्देश दिले. कॉल बिफोर यु डिग हे मोबाईल ॲप वापरण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या व आवश्यक तेथे वाढीव क्षमतेचे रोहित्रे बसविण्यास सांगितले.



Powered By Sangraha 9.0