माणकोली-मोठागाव पूलावरून जड व अवजड वाहनांना बंदी

    04-Jul-2025   
Total Views |

डोंबिवली, माणकोली व मोठागाव उड्डाणपूलावरून वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता जड व अवजड वाहनांना पूर्णपणे प्रवेश बंद करण्यात आला आहे. या बाबतच आदेश वाहतूक विभागाचे पोलिस उपआयुक्त पंकज शिरसाट यांनी काढले आहेत.

डोंबिवली वाहतूक विभागाच्या हद्दीत माणकोली-मोठागाव उड्डाणपूल वाहतूक करिता खुला करण्यात आला आहे. सदर रस्ता सुरू झाल्यापासून भिवंडी- ठाणो ते डोंबिवली असा मार्ग जवळचा झाला आहे. या मार्गावरून वेळेची बचत होत असल्याने सदर मार्गावरून मोठय़ा प्रमाणात वाहनांची वाहतूक सुरू आहे. डोंबिवलीतील रस्ते अरूंद आहेत. त्यामुळे याठिकाणी जड -अवजड वाहनांची वाहतूक कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहावी याकरिता या पूलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सदर वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलिस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडोर, ऑक्सीजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही असे आदेशात सांगण्यात आले आहे.



योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.