‘सायबर सुरक्षा योध्दे बनूया’ यावर मार्गदर्शन शिबीर

04 Jul 2025 21:59:02

डोंबिवली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, डोंबिवली बाजीप्रभू नगर आणि रामनगर पोलीस ठाणे, डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने ५ जुलै रोजी, सायं ५.३० वाजता, स.वा.जोशी विद्यालय सभागृह, तळमजला, डोंबिवली पूर्व येथे ‘सायबर सुरक्षा योध्दे बनूया’ या मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सायबर गुन्हे आणि संरक्षण या विषयावर महाराष्ट्र पोलिस सेवा सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे, आणि रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड मार्गदर्शन करणार आहेत.

रा.स्व.संघ ही जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना असून डोंबिवली शहरात संघाचे काम अनेक वर्षापासून अविरतपणे सुरू आहे. येत्या दसऱ्याच्या दिवशी रा. स्व. संघाला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या शताब्दी वर्षात संघ दृष्टया नियोजित वस्तीश: अनेक समाजभिमुख कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. रा.स्व.संघ शताब्दी वर्षात अनेक कार्यक्रमांची आयोजन करणार आहे. त्याची सुरूवात सायबर सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाने होत आहे. यामध्ये भविष्यात स्व संरक्षण, फायर सेफ्टी, इलेक्ट्रॉनिक वेस्ट क्लेकशन, कापडी पिशव्यांचे वाटप अशा अनेक उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहान संस्थेतर्फे करण्यात आले आहे.



Powered By Sangraha 9.0