मुंबई(Chief Justice of Bharat B. R. Gavai at Mumbai): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे अनावरण भारताचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या हस्ते शनिवार दि. ५ जुलै रोजी सरकारी विधी महाविद्यालय (GLC) मुंबई येथे करण्यात येणार आहे. याकरीता सरकारी विधी महाविद्यालयाच्या आवारात स्मारकाच्या अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांचा सत्कारही करण्यात येणार आहे.
सरकारी विधी महाविद्यालयात होणाऱ्या सत्कार समारंभ कार्यक्रमासंबधित महाराष्ट शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने परिपत्रक काढून संबधित विभागाला सरन्यायाधीशांच्या दौऱ्याविषयी विशेष सूचना दिल्या आहेत. हा कार्यक्रम शनिवार दि. ५ जुलै रोजी सकाळी ९ वाजता विधी महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे.