मुंबई : “मी आज खूप खुश आहे, आनंदाचा क्षण आहे. हे सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना नाशिकमध्ये अटक केली. तेव्हा त्यांना भेटण्यासाठी गेलेली मी एकमेव होती. त्यांना भेटण्यासाठी गेली तेव्हा मी ढसाढसा रडली होती. तेव्हा तिच्यासाठी काही मला नेता आलं नाही, पण तिने माझ्यासाठी एक मोठी बहिण म्हणून एक माळ ठेवली होती.”, असे म्हणत माजी मुख्यमंत्री उमा भारती यांच्या अश्रूंचा बांध फुटला. ‘भगवा दहशतवाद’ या संज्ञेखाली निष्पाप हिंदू नेत्यांना तत्कालीन काँग्रेस सरकारने दिलेल्या वेदना आजही विस्मृतीत जाता जात नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
एनआयए विशेष न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोटातील सात आरोपींची १७ वर्षांनी निर्दोष मुक्तता केली आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरोधातील आरोप तपास यंत्रणा सिद्ध करू शकलेल्या नाहीत. “केवळ शंका पुरेशी नाही, विश्वासार्ह पुरावा असणे आवश्यक आहे, असे निरिक्षण न्यायालयाने नोंदविले आह. साक्ष, तपास व पुरावे तपासले, त्यानंतरच आरोपींना निर्दोष ठरवण्यात आले. न्यायालयाने हल्ल्यात मृतांच्या कुटुंबाला दोन लाखांच्या नुकसानभरपाईचा आदेश दिला आहे तर जखमींना ५० हजार रूपयांची मदत जाहीर केली.
त्या म्हणाल्या, “मी नाशिकला साध्वी प्रज्ञाला भेटण्यासाठी गेले होते, त्यावेळी मला तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराची माहिती ऐकून होती. पण त्यांना जेव्हा ही गोष्ट विचारली तेव्हा तिनेही या गोष्टीला दुजोरा दिला. ही गोष्ट यातना देणारी होती. हा निर्णय त्या सर्व हिंदूंना ज्ञाय देणारा आहे.” “पी. चिदंबरम, दिग्विजय सिंह, राहुल गांधी डावे आणि सर्व काँग्रेसी या सर्वांनी ज्या प्रकारे भगवा दहशतवाद हा शब्द जाणीवपूर्वक वापरला. त्यांना भर चौकात उभे करून कोणती शिक्षा करणारे हे देशाला सांगा.”, असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.