उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदार यादी निश्चित

31 Jul 2025 19:53:28

नवी दिल्ली : जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यामुळे आवश्यक असलेल्या उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदार यादी निश्चित करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने गुरुवारी सांगितले आहे.

भारताच्या उपराष्ट्रपतींची निवड राज्यसभेतील निवडून आलेल्या आणि नामांकित सदस्य आणि लोकसभेतील निवडून आलेल्या सदस्यांद्वारे केली जाते. आयोगाने एका निवेदनात म्हटले आहे की, २०२५ च्या उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदार यादी अंतिम करण्यात आली आहे. ही यादी अधिसूचना जारी झाल्यापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयात स्थापन केलेल्या विशेष काउंटरवरून खरेदी करता येईल.

धनखड यांच्या राजीनाम्याच्या अवघ्या दोन दिवसांनंतर निवडणूक आयोगाने नवीन उपराष्ट्रपती निवडण्याची प्रक्रिया सुरू केली. धनखड यांनी त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळाच्या अवघ्या दोन वर्षातच राजीनामा दिला असला तरी, नवे उपराष्ट्रपती उर्वरित कार्यकाळ नव्हे तर संपूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील.


Powered By Sangraha 9.0