नवी दिल्ली : न्यायालयाच्या निर्णयाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सत्य उघड झाले आहे. काही लोकांनी वैयक्तिक आणि राजकीय फायद्यासाठी त्यांच्या सत्तेचा गैरवापर केला आणि हिंदू धर्म आणि संपूर्ण हिंदू समाजाला दहशतवादाशी जोडण्याचा दुर्भावनापूर्ण प्रयत्न केला. दीर्घ न्यायालयीन प्रक्रिया आणि तथ्यांच्या आधारे, न्यायालयाने आज आपल्या निर्णयाने त्या निराधार आरोपांना निरर्थक सिद्ध केले आहे.
काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी : डॉ. सुरेंद्र जैन, विहिं
काँग्रेसने हिंदू दहशतवाद आणि भगवा दहशतवाद असा बनाव रचून दोन दशके हिंदू समाजाला अपमानित केले. काँग्रेसचे हे षडयंत्र आज उध्वस्त झाले आहे. मतपेढीसाठी जिहाद्यांना वाचविण्यासाठी संपूर्ण हिंदू समाजाला अपमानित करण्यात आले होते. संतांना तुरुंगात टाकून संतपरंपरेचा अपमान करण्यात आला होता. त्याचीच शिक्षा काँग्रेसला आता मिळत असून सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस पक्षाने हिंदू समाजाची माफी मागायला हवी. त्याचप्रमाणे हिंदू दहशतवादाचा कट रचणाऱ्यांचाही खरा चेहरा समोर आणण्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक ते करावे, अशी प्रतिक्रिया विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) संयुक्त महासचिव डॉ. सुरेंद्र जैन यांनी दिली आहे.
काँग्रेसचा भारतविरोधी चेहरा उघड : योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदे
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता म्हणजे सत्याचा विजय आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा काँग्रेसची भारतविरोधी, न्यायविरोधी आणि सनातनविरोधी भूमिका उघड झाले आहे. काँग्रेसने 'भगवा दहशतवाद' ही खोटी संकल्पना वापरून कोट्यवधी संत आणि राष्ट्रसेवकांची प्रतिमा मलिन करण्याचा गुन्हा केला आहे. काँग्रेसने जाहीरपणे त्यांचे अक्षम्य दुष्कृत्य स्वीकारावे आणि देशाची माफी मागावी.
काँग्रेसचा लांगुलचालनी चेहरा उघड : हिमंत बिस्व सर्मा, मुख्यमंत्री, आसा
हिंदू कधीही दहशतवादी असू शकत नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी संसदेत सांगितले आहे. आपली संस्कृती कधीही दहशतवादाला प्रोत्साहन देत नाही. मात्र, काँग्रेसच्या राजवटीत विशिष्ट समुदायास खुश करण्यासाठी ‘हिंदू दहशतवाद’ ही संज्ञा तयार करण्यात आली. खरे तर हिंदू आणि दहशतवाद या दोन्ही परस्परविरोधी संकल्पना आहेत. त्यामुळेच न्यायालयाने आज ‘हिंदू दहशतवाद’ ही संकल्पना मोडून काढली आहे.