फ्रान्स आणि ब्रिटन पाठोपाठ आता कॅनडासुद्धा 'पॅलेस्टिन'ला राष्ट्र म्हणून मान्यता देण्याची शक्यता!

31 Jul 2025 15:52:45

canada-on-palestine-as-a-nation
 
 
ओटावा: पॅलेस्टिनलायापुर्वी फ्रान्स आणि ब्रिटनने राष्ट्र म्हणून मान्यता दिली होती, दरम्यान आता फ्रान्स आणि ब्रिटन पाठोपाठ कॅनडासुद्धा पॅलेस्टिनला राष्ट्र म्हणून मान्यता देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी दि.३० जुलै रोजी कॅनडातील ओटावा येथे झालेल्या नॅशनल प्रेस थिएटरमध्ये याबाबत भाष्य केले.

दरम्यान कॅनडाचे पंतप्रधान कार्नी म्हणाले की,"सप्टेंबरमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत कॅनडा पॅलेस्टिनला राष्ट्र म्हणून मान्यता देईल". कार्नी पुढे म्हणाले कि, " गाझामधील वाढत्या उपासमारीच्या संकटासह जमिनीवरील संकट पाहून माझ्या डोळ्यांसमोरील पॅलेस्टिनची राष्ट्र म्हणून राहण्याची शक्यता अक्षरशः कमी होत चालली आहे.
युद्धपरिस्थितीत पॅलेस्टिनला आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत्या टीकेचासुद्धा सामना करावा लागत आहे."

"येणाऱ्या पुढील काळात २०२६ मध्ये होणाऱ्या निवडणुका, भ्रष्टाचारविरोधी उपाययोजना आणि निःशस्त्रीकरण केलेले पॅलेस्टिनी राष्ट्र यांच्या आवश्यक सुधारणांबद्दल पॅलेस्टिनी प्राधिकरणाच्या वचनबद्धतेवर कॅनडाने हे पाऊल उचलले आहे." असे पंतप्रधान कार्नी म्हणाले.

दरम्यान, गाझामधील परिस्थितीबद्दल इस्रायलच्या सहयोग्यामध्ये राग दिसून येत असताना, फ्रान्स आणि ब्रिटन पाठोपाठ कॅनडाचे पंतप्रधान कार्नी यांनी पॅलिस्टिनला राष्ट्र म्हणून मान्यता देण्याची घोषणा केल्याचे दिसून येत आहे, त्याचबरोबर, युरोपियन युनियनचा सदस्य असलेल्या माल्टानेसुद्धा पॅलेस्टिनीला राष्ट्र म्हणून मान्यता देण्यात येईल असे जाहीर केले.

ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी १० जुलै रोजी लंडनमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेत इस्रायली सरकारवर टिकेची झोड उठवत म्हणाले होते कि, "इस्त्रायल सरकारने जर गाझातील युद्धजन्य परिस्थिती संपवण्यासाठी ठोस पावले उचलली नाही तर, युके आणि फ्रान्स सप्टेंबरमध्ये पॅलेस्टिनला राष्ट्र म्हणून मान्यता देईल." असे ब्रिटिश पंतप्रधान स्टारमर आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन म्हणाले होते.
 
Powered By Sangraha 9.0