एक-एक मंडल दत्तक घेऊन संघटनात्मक बांधणीचा संकल्प करा; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे माजी आमदार, खासदारांना आवाहन

31 Jul 2025 19:57:18

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीसाठी पक्षाच्या प्रत्येक माजी खासदार आणि आमदाराने संघटनात्मक बांधणीचा संकल्प करा, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले आहे. गुरुवार, ३१ जुलै रोजी प्रदेश कार्यालयात झालेल्या माजी आमदार आणि खासदारांच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, संजय केनेकर, माधवी नाईक, मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची रणनीती आखण्यात आली. तसेच संघटनात्मक स्थितीचा जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. बूथस्तरापासून मतदान केंद्रांपर्यंतची मोर्चेबांधणी, पदाधिकाऱ्यांची जबाबदारी, संपर्क मोहिमा यावर यावेळी भर देण्यात आला. कार्यकर्त्यांचा जोश, जनसंपर्क आणि केंद्र-राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यावरही विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.


Powered By Sangraha 9.0