
मुंबई : १ ऑगस्टपासून नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI - National Payment corporation of India) नवे युपीआय नियम लागू करणार आहे. ही नियमावली भारताची डिजिटल पेमेंट सिस्टम अधिक मजबूत आणि जलद करण्यात फायदेशीर ठरणार आहे.
बदलण्यात येणारे नियम खालील प्रमाणे:
१ - दररोज बॅलन्स तपासण्यावर मर्यादा
आता दिवसातून फक्त ५० वेळाच बॅलन्स तपासता येणार आहे. नियमानुसार तुम्ही जरी Phonepay, GooglePay, Paytm इ. ॲप वापरत असाल तरीसुद्धा दिवसातून फक्त ५० वेळाच बॅलन्स तपासण्याचा नियम लागू होतो. हा नियम सर्व्हरवरील ओव्हरलोड कमी करण्यासाठी तयार केलेला आहे.
२- ऑटोपे (Recurring Payments) साठीचा वेळ
ऑटोपे जसे Netflix, SIP, विमा यांची पेमेंट्स आता फक्त काही वेळात म्हणजे सकाळी १० वाजण्यापूर्वी, दुपारी १ ते ५, आणि रात्री ९:३० नंतरच होतील. बाकीच्या वेळात हे प्रोसेसिंग बंद ठेवण्यात येईल.
३ - ट्रांजेक्शन स्टेटस तपासण्याची मर्यादा
जर एखादे पेमेंट अडकले तर वापरकर्ता एका व्यवहाराची स्थिती दिवसांतून तीन वेळेपेक्षा जास्तवेळा तपासू शकणार नाही. त्याबरेबरच प्रत्येक तपासण्यांमध्ये किमान ९० सेकंदांचे अंतर असणे आवश्यक आहे.
४ - दर्शवले जाणारे लाभार्थ्याचे (Recipient’s) नाव
तुम्ही पैसे पाठवण्याआधी, पैसे मिळणार्या व्यक्तीचे बँकेतील अधिकृत नाव पेंडिंग पेमेंटमलीस्टमध्ये दिसेल. ह्यामुळे फसवणूक टाळली जाईल.
५ - जुने आयडी आणि निष्क्रिय युजर अकाउंट्स बंद
जे यूपीआय आयडी एका वर्षापेक्षा जास्त काळ निष्क्रिय आहेत, त्यांना बंद करण्यात येईल. यामुळे सर्व युजर्सनी तीन महिन्यांतून एकदा तरी आपले युपीआय अकाउंट वापरणे अनिवार्य झाले आहे.
६ - इतर अपडेट्स आणि सूचना
पेमेंट लिमिट्समध्ये मोठा बदल नाही. सामान्य व्यवहारासाठी १ लाख आणि शिक्षण व आरोग्यासाठी ५ लाख पर्यंतची मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे. एनपीसीआयने मे २०२५मध्ये जारी केलेल्या अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेसमध्ये मार्गदर्शिका व वापर कसा करावा हे सांगितले आहे. ह्या सुविधेचा वापर करण्यासाठी ३१ जुलै पर्यंतची मुदत बँका व पीएसपींना (पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर्स)दिली आहे. १ ऑगस्ट नंतर नवीन नियम लागू केले जातील. तो पर्यंत सिस्टम ऑडिट्स पूर्ण करणे आवश्यक आहे. नियमांची अंमलबजावणी न झाल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते.