कृषी खात्यातील घोटाळ्याच्या चौकशीसाठी SIT स्थापन करा! सुरेश धस यांची मागणी

30 Jul 2025 14:40:18


मुंबई : कृषी खात्यातील घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे. माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याच कालावधीत कृषी खात्यात घोटाळा झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यांनी मंगळवार, ३० जुलै रोजी माध्यमांशी संवाद साधला.

सुरेश धस म्हणाले की, "धनंजय मुंडेंना एका प्रकरणात क्लिनचिट मिळाली आहे. परंतू, मधल्या कालावधीत अनेक मोठे प्रकरण घडले आहे. कृषी विभागात एकच खरेदी झाली नसून मोठ्या प्रमाणात खरेद्या झाल्या आहेत. ही केस स्प्रे पंपापुरती आहे. अजून नॅनो युरीया, नॅनो डीएपी यासारख्या अनेक खरेदी झाल्या आहेत. डीबीटीचा निर्णय डावलून अनेक निर्णय घेण्यात आले. अधिकाऱ्यांनीच ७८ कंपन्या स्थापन केल्या. मोठ्या प्रमाणात खतांचे लिंकींग करण्याचे पाप मोठ्या प्रमाणात झाले आहेत. या बाबतीत स्वतंत्र एसआयटी स्थापन करून या सगळ्याची आणि चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी मी केली आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्याच कालावधीतील हे सगळे प्रकरण असून ते स्वत: कितपत कृषी खाते चालवायचे हा संशोधनाचा विषय आहे. कारण खाली आकाच सगळ्या बैठका घेत होते," असेही ते म्हणाले.

आकासाठी जेलमध्ये स्पेशल फोन! सुरेश धस यांची माहिती, म्हणाले...

सर्वोच्च न्यायालयात जाणार


धनंजय मुंडेंना मिळालेल्या क्लिनचिट विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार का? यावर बोलताना सुरेश धस म्हणाले की, "शंभर टक्के मी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. मी त्या निकालाची प्रत काढली असून त्यात मला हस्तक्षेप करता येईल का? याबद्दलची माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या वकीलांकडून घेतो आहे. यात मला स्वत:ला हस्तक्षेप करता येत नसेल तर लाभार्थी म्हणून कुठल्याही शेतकऱ्याच्या मार्फत मी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे," असेही त्यांनी सांगितले.


Powered By Sangraha 9.0