मॉस्को: रशियामध्ये मोठा भूकंप झाला असून, भूकंपाच्या महाप्रलयाने रशिया हादरले आहे. जवळपास ८.८ रिश्टर स्केलपर्यंत झालेल्या या भूकंपांची तीव्रता दिसून आली.
रशियाच्या कामचटका येथे हा भूंकंप झाला असून या भूकंपामुळे जपानला त्सुनामीचा इशारा देण्यात आला आल्याची माहिती आहे. रशियातील या भूकंपामुळे बाबा वेंगा यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरल्याचे म्हटले जात आहे. बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाणीत ते म्हणाले होते कि, "२०२५-२०२६ सालच्या दरम्यान, पृथ्वी हादरेल आणि लोकांना भूकंप आणि पूरासारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागेल, या आपत्तीतून मोठे नुकसान होउ शकते." असे बाबा वेंगा यांनी भाकित वर्तवले होते.
यूएसजीएसनुसार (युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे),भूकंप ही एक धोकादायक नैसर्गिक आपत्ती असून आतारपर्यंत झालेल्या जगभरातील भुकंपामुळे बरेच नुकसान झाले आहे. १९६० साली बायोबियो येथे ९.५ रिश्टर स्केलचा भूकंप होऊन त्याला वाल्डिव्हिया भूकंप असे म्हटले जाते. बायोबियो येथे झालेला हा भूकंप जगातील आतापर्यंतचा सर्वात मोठा भूकंप असून, यात १ हजार ६५५ लोक मृत्युमुखी पडून २० लाख लोक बेघर झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा भूकंप हा अरुणाचल प्रदेशात १९५० साली झाला होता, जो ८.६ रिश्टर स्केलचा होता. या भूकंपांला आसाम-तिबेट भूकंप म्हणूनही ओळखले जाते. या भूकंपामुळे ७८० भारतीय नागरीकांना आपला जीव गमवावा लागला होता.