अल कायदा दहशतवादी मॉड्यूलची मास्टरमाइंड शमा परवीन अटकेत! गुजरात एटीएसची कारवाई

30 Jul 2025 12:27:33

बंगळुरू : (Gujarat ATS arrested Al Qaeda Module mastermind Sama Parveen) अल कायदा दहशतवादी मॉड्यूलप्रकरणी गुजरात दहशतवादविरोधी पथकाला खूप मोठं यश मिळाले आहे. गुजरात एटीएसने अल कायदा दहशतवादी मॉड्यूलची एक महिला दहशतवाद्याला अटक केली आहे. अल कायदा दहशतवादी मॉड्यूलची मास्टरमाइंड शमा परवीनला बंगळुरूतून ताब्यात घेण्यात आले आहे.


३० वर्षीय शमा ही झारखंडची रहिवासी असून कर्नाटकातील बंगळुरूमध्ये राहत होती. ती AQIS मॉड्यूल चालवत होती. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पाळत ठेवण्यात आली होती. शमा ही पाकिस्तानमधील लोकांच्या संपर्कात होती, अशी माहिती गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांनी दिली. गुजरात एटीएस पत्रकार परिषदेद्वारे या अटकेबाबत माहिती देणार आहे.

यापूर्वी या मॉड्यूलप्रकरणी चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. दोघांना गुजरातमधून, एकाला नोएडामधून आणि एकाला दिल्लीतून अटक करण्यात आली होती. अशातच आता शमा परवीनला अटक करण्यात आल्याने हे गुजरात एटीएसचे मोठे यश समजले जात आहे.




Powered By Sangraha 9.0