उबाठा गटाला नाशिकमध्ये पुन्हा धक्का; अनेक माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

03 Jul 2025 18:07:48

मुंबई : उबाठा गटाला नाशिकमध्ये पुन्हा एकदा धक्का बसला आहे. गुरुवार, ३ जुलै रोजी नाशिक शहरातील अनेक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आ. राहुल ढिकले, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, ज्येष्ठ नेते बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी, सुधाकर बडगुजर, मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांच्यासह काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी नाशिक शहरातील उबाठा गटाचे उपजिल्हा प्रमुख आणि माजी नगरसेवक सचिन मराठे, माजी नगरसेवक आणि नामको बँकचे संचालक प्रशांत दिवे, माजी नगरसेविका डॉ. सीमा ताजणे, माजी नगरसेवक कमलेश बोडके, उपजिल्हा प्रमुख कन्नू ताजणे यांच्यासह शरद पवार गटाचे गणेश गिते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
Powered By Sangraha 9.0